Posts

ध्येय वेड्यांसाठी ही पण एक सुवर्ण संधीच-प्रा. मनोहर केंगार

Image
जिल्यात काही दिवासापासून करोना रुग्ण संख्या वाढत आहे, राज्य सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत तरी विद्यार्थ्यांनी घरी राहून आपल्या बुद्धीचा पुरेपूर सकारात्मक वापर करावा व चालू अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा तसेच स्वतःचा छंद जपत नवीन कलागुणांना वाव देत नवीन व्यवसायावर संशोधन सुरु करावे तसेच नवंनवीन संशोधन प्रोजेक्ट्स वर कामं करावे या मूळे तुमचा स्वतःचा प्रोफाइल तयार होईल. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच केंद्र शासनामार्फत आयोजित विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करावी. यांची तयारी करताना ध्येय निश्चित करून विध्यार्थ्यांनी यशाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन नुतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठेमहांकाळ “करिअर कट्टाचे” महाविद्यालयीन समन्वयक प्रा. मनोहर केंगार यांनी विद्यार्थ्यांना केले. दि. 10 जानेवारी ते 15 फेब्रुवारी परेंत सर्व कॉलेज, महाविद्याल, शाळा करोनाच्या वाडत्या फैलामुळे महाराष्ट्र शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी विद्यार्थ्य...

मागील वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात फार्मसी जोमात- प्रा. मनोहर केंगार

Image
  चालू शैक्षणिक घडामोडी पाहता वर्ष २०२१-२२ मध्ये औषधनिर्माणशास्त्र अर्थात फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक आणि निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता, यंदा त्यांनी या अभ्यासक्रमाला पसंती दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तंत्रशिक्षण संचलनालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डी फार्म अभ्यासक्रमाला जागांच्या तुलनेत वर्ष २०२०-२१ मध्ये चार पट जास्त अर्ज आल्याचे समोर आले आहे. मागील २ वर्षाची स्थिती पाहता करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रा बरोबर औषधनिर्माणशास्त्राचा रोल हि महत्वाचा असल्याचा दिसून आला. कदाचित ह्याच्यामुळेच पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढ वाढताना दिसत आहे. असे असले तरी दरवर्षी पदवीच्या काही जागा रिक्त राहायच्या. मागील दोन वर्षाची स्तिथी पाहता यंदाच्या तुलनेत प्रत्येक औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डी फार्म व बी.फार्म पदवी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याची दिसून येते. विध्यार्थ्यांना ह्या क्षेत्रामध्ये विविध विभामध्ये नोकरी करण्याची संधी उपलबद्ध होते. फार्मसी केलेल्या विध्यार्थ्यांना हेल्थ सिस्टम फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी ...