मागील वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात फार्मसी जोमात- प्रा. मनोहर केंगार

 


चालू शैक्षणिक घडामोडी पाहता वर्ष २०२१-२२ मध्ये औषधनिर्माणशास्त्र अर्थात फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक आणि निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता, यंदा त्यांनी या अभ्यासक्रमाला पसंती दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तंत्रशिक्षण संचलनालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डी फार्म अभ्यासक्रमाला जागांच्या तुलनेत वर्ष २०२०-२१ मध्ये चार पट जास्त अर्ज आल्याचे समोर आले आहे. मागील २ वर्षाची स्थिती पाहता करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रा बरोबर औषधनिर्माणशास्त्राचा रोल हि महत्वाचा असल्याचा दिसून आला. कदाचित ह्याच्यामुळेच पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढ वाढताना दिसत आहे. असे असले तरी दरवर्षी पदवीच्या काही जागा रिक्त राहायच्या. मागील दोन वर्षाची स्तिथी पाहता यंदाच्या तुलनेत प्रत्येक औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डी फार्म व बी.फार्म पदवी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याची दिसून येते. विध्यार्थ्यांना ह्या क्षेत्रामध्ये विविध विभामध्ये नोकरी करण्याची संधी उपलबद्ध होते. फार्मसी केलेल्या विध्यार्थ्यांना हेल्थ सिस्टम फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, इंडस्ट्रिअल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट, क्वालिटी अशुरन्स, क्वालिटी कंट्रोल, रिसर्च डेव्हलोपमेंट, फॉर्मुलेशन डेव्हलोपमेंट, मॅनुफॅक्चरिंग, पॅकेजिंग, फार्मा डी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स, रेग्युलेटरी अफेअर आणि एम.फार्म म्हणून काम करता येतं.  


फार्मसी क्षेत्रात लागणारे काही गुण

- अचूकता

- तर्क बुद्धी

- तपशीलवार

- वैज्ञानिक दृष्टिकोन

- संशोधन अभिमुखता

- विश्लेषणात्मक दृष्टिकोन

- प्रामाणिकपणा


प्रा. मनोहर केंगार

नुतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठेमहांकाळ

Comments

  1. True sir, and Nice, helpful article for Pharma feild.

    ReplyDelete
  2. Nice manoj sir.... proud to be a part of this👍

    ReplyDelete

Post a Comment